Sunday, January 21, 2024

शालेय आठव पान

 





शाळेच्या व्हरांड्यात 

हसेल पुन्हा खडू न फळा 

मैदानाच्या प्रांगणात 

आठवणींचा फुलतो मळा


शिक्षकांचा आदर नि दरारा 

विसरावा कसा पसारा बाकाचा

उडत होते स्वप्नांच्या पानांची विमाने

होता हिस्सा मार्कांचा न शिक्षेचा 


कळेना तास नक्की कशाचा 

विषयाचा की खोड्यांचा 

मस्ती मजा मधल्या सुट्टीतली 

खाताना डबा एकमेकांचा


आठवणीतले दिवस 

येतील का पुन्हा परतूनी

हलकेच पाणवती चक्षू 

आठवांचे असे बरसूनी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...