Friday, March 25, 2022

रंगून जाऊ दे


 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

रंगून जाऊ दे

तुझ्या रंगात
घनश्यामा, सुंदरा,


रंगून जाऊ दे
तुझ्या बासुरीत
मुरलीधरा,मनोहरा,


रंगून जाऊ दे
तुझ्या बाललीलेत
नंदकिशोरा,वासुदेवा,


रंगून जाऊ दे
तुझ्या छायेत
गिरीधरा ,गोपाला,


रंगून जाऊ दे
तुझ्या रासखेळात
कृष्ण कन्हैया ,



रंगून जाऊ दे
तुझ्या भक्तीत
दयाघना, नारायणा

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Friday, March 4, 2022

हायकू

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कसे विसरु 

रमते तुझ्यातच 

मन पाखरू 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रेम भावना
रुजली ह्रदयी खोल
मी हतबल

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नाते जपले
ते दृढ विश्वासाचे
प्रेम आपले 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जिद्द ठेवावी
परिस्थिती झुकेल
यश मिळेल

परिस्थिती ही
बदलेल केव्हाही
ठेवा संयम

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


प्रेमकहाणी

 तुझ नी माझ

प्रेम पहिले

अनोखा भाव 

ह्रदयी जागले


नवलाईची 

प्रीत पहिली

आठवता तु

ये लाली गाली 


विसरु कशा 

आठवणी त्या

आपल्या भेटी 

सांजवेळेच्या


सप्तपदीचे

स्वप्न नयनी 

झाले साकार 

सहजीवनी


पाहे दुनिया 

प्रीत अनोखी 

तुझी न माझी 

प्रेमकहाणी




शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...