Thursday, October 21, 2021

आपलं नातं....

 तुझी माझी अबोल प्रीत ....

नजरेतून होत होती व्यक्त .....

तुझी माझी सोबत ....

जशी रिमझिम बरसात.....

तुझं आयुष्यात असणं......

नभातलं शितल चांदणं.....

दिरंगाईने का होईना.....

पण, तुला कळाल...

आपल नातं बहारलं.....

Monday, October 18, 2021

आभाळ चांदण्यांचे...

 


पाहताना स्वच्छ, शुभ्र आभाळ

मन होत असे निर्मळ 

वार्‍याला सहन नाही व्हायचं

अचानक वावटळ असं उठवायचं

चांदण्यातील आभाळ पाहत 

उठतात तरंग प्रेमाचे मनात 

पण, सहन नाही झाले वार्‍याला 

वाहून नेले नभांना, झाकोळले चांदणीला

Sunday, October 17, 2021

प्रश्नही तुच उत्तरही तुच...


 प्रश्न तुच अन् उत्तर ही तुच 

नजरेतल्या भावनांचं उत्तर तुच

जीवनातील प्रत्येक क्षणाचं उत्तर तुच 

अखेरच्या श्वासाचंही उत्तर तुच आणि तुच

Friday, October 15, 2021

काहूर दाटते....

 




सांजसमयी काहूर मनी दाटते 

प्रीतीची साद तुला घालते

तुझ्यासाठी काही वेगळेच वाटते

आठवणीने हुरहुर अंतरी वाढते

Wednesday, October 13, 2021

पावसाची सर.... 🌧🌧


 पावसाची तीच सर एकदाच पडून गेली .....

जाता जाता सृष्टीलाही सजवून गेली .....

निसर्गात प्रेमभावना जागवून गेली.....

चोहीकडे नवचैतन्य बहरू लागली .....

प्रीतीची भाषा नयनांतून दिसू लागली .....

नेमकी तीच गोष्ट  सांगायची राहून गेली....

धुंद सरी ....

 


आठवतात आठवणी अशा .. .

श्रावणातल्या धुंद सरी जशा.. .

दरवळत राहतो गंध असा .....

ओल्या मातीचा सुगंध जसा....

आठवणीत रममाण अशी .....

गगनात विहारतो मुक्त पक्षी .....

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

Tuesday, October 12, 2021

आठवणी....

 


आठवणीं रुजल्या मनात खोलवर ...

मनातल्या आठवणी होत नाही हद्दपार ....

केला किती प्रयत्न तरी माझीच होते हार....

पुन्हा त्याच आठवणीत रमून जाते फार...

अनजान

 खुद से हूं अनजान ..   

खोज रही एक आसमान .... 

उम्मीदों के पर लिए भरू उड़ान .....

करने पुरे सारे दिल के अरमान.......

नव्याने......

 नव्याने माझं असं काही शोधू पाहते 

तरी शोधताना का काही हरवून जाते 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

नव्याने आयुष्याच गणित सोडवू पाहते 

सोडवताना का काहीतरी बाकी राहते 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

नव्याने सुटणाऱ्या गोष्टी जुळवून पाहते

जुळवताना नात्यांची वीण घट्ट करु पाहते

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Monday, October 11, 2021

धुके सरती

 धुके सरती 

नभी भास्कर 

अर्ध्य देउनी 

जोडती कर

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

धुके सरती

मळभ सरी 

शुभ्रता नभी

प्रसन्न करी 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Sunday, October 10, 2021

उडान

 धुके हे विरत जावे .....

सोनेरी किरणांनी अंबर रंगले.....

आशेचे पंख घेउन उमदीचे बळ मिळाले....

स्वप्नपूर्ती ध्येयासाठी उडान भरारी घ्यावे....

Saturday, October 9, 2021

ब्रम्हांडाचा नाविक

 ब्रम्हांडाचा असा एक 

तो तरबेज नाविक 

नित्यनेमाने करता स्मरण 

होती नष्ट असत्याची लाट 

होईल पार नौका जीवनाची 

या संसाररुपी सागरातूनी

पहाट प्रगतीची.....

 वेदनांवर फुंकर घालूनी .....

तिमिरातुनि व्हावी पहाट नवी ....

एकमेका साथ सोबत देउनी .....

प्रगतीची वाट ही नवी धरावी .....

Tuesday, October 5, 2021

अंतरीचे सुख

 ध्येय निश्चितच आहे दुर 

नको आपल्यात अंतर

हवी जन्मांतरीची साथ

सोबत अंतरीचे सुख

आतुरता.....

 भेटण्यास दोघेही आतुर.....

नदी भेटण्या सागरास......

पाहण्यास दोघेही आतुर .....

चांदणी पाहण्या चंद्रास .....

दोघेही मिलनास आतुर ......

बरसणार्या प्रेमसरीत..... 

Monday, October 4, 2021

माझी शाळा...

 माझी शाळा "साधना मुलींची शाळा "

चिवचिवाट असे आम्हा चिमण्या मुलींचा

सकाळी अन् दुपारी भरत असे शाळा 

शाळेत जायला नसे कधीच कंटाळा 

आवडीच्या ताईंचा येताच तास 

त्या विषयात वाटे गोडी खास 

आँफ तासाला यायची मजा

पी. टी.चा तास कवायतीचा

बघता बघता आली दहावी 

निरोप समारंभाला आसवे गळाली 

आयुष्यात पुढे निघून आलो सगळ्याजणी

शाळेच्या आठवणीत रमते मन आजही

Sunday, October 3, 2021

प्रामाणिकतेच्या वाटेवर....

 प्रामाणिकपणाचे मोल खुप 

नाही करावे लागत सिद्ध 

प्रामाणिकपणाचा असा तो प्रभाव 

संकटांनाही घ्यावी लागते माघार 

चालता प्रामाणिकतेच्या वाटेवर 

तयाच्या चित्ती रुजते समाधान

निर्धार... स्त्री शिक्षणाचा...

 बाहेर पडण्या होती बंदी ,होती अनेक बंधने 

केला सहन अपमान, झेलले चिखलाचे गोळे

न डगमगता घेतला निर्णय ,पाऊल टाकले पुढे 

साथ मिळाली पतीची, दिला लढा निकाराने 

निर्धाराने ध्यास घेतला .....

स्त्री शिक्षणाचा पाया रोवला ......

फुले वाड्यात काढली पहिली मुलींची शाळा

Saturday, October 2, 2021

निर्धार......

 नमन सैनिकांना.... 🙏🏼🙏🏼

       दुश्मनांचा करती सामना 

        निर्धाराने उभे राहती सीमापार 

वंदन शेतकरी बांधवाना ....🙏🏼🙏🏼

         आली किती नैसर्गिक आपत्ती 

         निर्धाराने काळ्या मातीत राबती

सलाम कष्टकरी लोकांना ....🙏🏼🙏🏼

        रोजच्या बिकट परिस्थितीत 

        निर्धाराने करताता दोन हात 

नमस्कार सर्व देशवासीयांना ....🙏🏼🙏🏼

         कोरोनाच्या वाईट काळात 

         निर्धाराने एकमेका दिली साथ 

असो संकटांचा, अपेक्षांचा डोंगर दुर्गम

करतात सगळेच निर्धाराने त्यावर मात

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Friday, October 1, 2021

🌹प्रेमाची यादी 🌹

 तुझ्या वरच्या प्रेमाची ... 

कशी किती करु यादी .... 

अब कर लो इकरार .... 

ना करो कल का इंतजार .....

आपकी यादों में.....

 आपकी यादों में ...

हर राह पर 

ढुंढते रहे ....

तनहाई मे बाते

करते रहे ......

चांद मे आपको 

देखते रहे ....

रात रात भर 

जगते रहे .....

हर पल महसूस 

करते रहे ......

अब सांसे लेना 

ही भूल गए.... 

आपकी यादों में ....

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...