Friday, November 10, 2023

दिपावली

 


दिव्यांची रोषनाई अंगणी

रंगात रंगली रंगवाली

शोभे आकाश कंदील दारी

आनंदाची आली दीपावली


दिवा लावू विष्णू - लक्ष्मीला

सुरू झाली दिवाळी रमा एकादशीला

येता बारस पुजूया गाय वासराला 

निरोगी आरोग्य मागु धन्वंतरीला 


दिन तो नरकचतुर्दशीचा 

करुया मात असुरी विचारांचा 

दिव्या दिव्यांनी उजळला काळोख रात्रीचा 

राहो सदा सहवास घरोघरी लक्ष्मीचा 


प्रीत नात्यातला प्रीतीचा 

दिवाळी पाडवा सण हा गोडीचा 

ओवाळीते बहिण भाऊराया 

बंध हा भाऊ - बहिणीच्या नात्याचा

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...