Saturday, July 25, 2026

विठूची वारी


ओढ लागली कळसाची
आस तयाच्या भेटीची
हरपते तहान भूक
अशी अगाध लिला वारीची

बरसती आषाढ धारा
कधी ऊन तर कधी वारा
मुखी नित्य मंत्रघोष
वारी चाले अशी पंढरपुरा

विसरून प्रपंच आपुला
वैष्णवांचा मळा फुलला
विठ्ठल विठ्ठल गाई
भीमे तिरी नाद गरजला

हरी नामात होऊनी दंग
तुळशी अन् मंजिरी संग
चालू विठूची वारी
पाहू हो पंढरी हाची रे चंग

उधळला अबीर गुलाल
नाही कुठला मनी मलाल
अशी लागे ब्रम्हानंदी टाळी
दुःख हि सरे काय त्याची मजाल

विठू सावळा विटेवरी
बोला राम कृष्ण हरी
दुरून पाही रखुमाई
आनंदली वैकुंठ नगरी

        ©️®️
    अश्विनी गोरखे.
      चिंचवड, पुणे.

1 comment:

  1. सुंदर भक्ती मय रचना ♥️

    ReplyDelete

विठूची वारी

ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...