आस तयाच्या भेटीची
हरपते तहान भूक
अशी अगाध लिला वारीची
बरसती आषाढ धारा
कधी ऊन तर कधी वारा
मुखी नित्य मंत्रघोष
वारी चाले अशी पंढरपुरा
विसरून प्रपंच आपुला
वैष्णवांचा मळा फुलला
विठ्ठल विठ्ठल गाई
भीमे तिरी नाद गरजला
हरी नामात होऊनी दंग
तुळशी अन् मंजिरी संग
चालू विठूची वारी
पाहू हो पंढरी हाची रे चंग
उधळला अबीर गुलाल
नाही कुठला मनी मलाल
अशी लागे ब्रम्हानंदी टाळी
दुःख हि सरे काय त्याची मजाल
विठू सावळा विटेवरी
बोला राम कृष्ण हरी
दुरून पाही रखुमाई
आनंदली वैकुंठ नगरी
©️®️
अश्विनी गोरखे.
चिंचवड, पुणे.
सुंदर भक्ती मय रचना ♥️
ReplyDelete