Friday, November 10, 2023

दिपावली

 


दिव्यांची रोषनाई अंगणी

रंगात रंगली रंगवाली

शोभे आकाश कंदील दारी

आनंदाची आली दीपावली


दिवा लावू विष्णू - लक्ष्मीला

सुरू झाली दिवाळी रमा एकादशीला

येता बारस पुजूया गाय वासराला 

निरोगी आरोग्य मागु धन्वंतरीला 


दिन तो नरकचतुर्दशीचा 

करुया मात असुरी विचारांचा 

दिव्या दिव्यांनी उजळला काळोख रात्रीचा 

राहो सदा सहवास घरोघरी लक्ष्मीचा 


प्रीत नात्यातला प्रीतीचा 

दिवाळी पाडवा सण हा गोडीचा 

ओवाळीते बहिण भाऊराया 

बंध हा भाऊ - बहिणीच्या नात्याचा

3 comments:

  1. दिवाळी सणाचे अप्रतिम शब्दगुंफण करुन वर्णन केलेले काव्य!✍️👌🌟🪔

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️🌟🌟🌟

    ReplyDelete

विठूची वारी

ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...