Monday, October 4, 2021

माझी शाळा...

 माझी शाळा "साधना मुलींची शाळा "

चिवचिवाट असे आम्हा चिमण्या मुलींचा

सकाळी अन् दुपारी भरत असे शाळा 

शाळेत जायला नसे कधीच कंटाळा 

आवडीच्या ताईंचा येताच तास 

त्या विषयात वाटे गोडी खास 

आँफ तासाला यायची मजा

पी. टी.चा तास कवायतीचा

बघता बघता आली दहावी 

निरोप समारंभाला आसवे गळाली 

आयुष्यात पुढे निघून आलो सगळ्याजणी

शाळेच्या आठवणीत रमते मन आजही

16 comments:

  1. अतिशय सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर कविता केली आहे माझ्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

    ReplyDelete
  3. शाळेच्या छान आठवणी सांगितल्यास 👌👌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर असतात या आठवणी👌👌👌👌

    ReplyDelete
  5. शाळेच्या आठवणी काही खासच असतात.माझ्या
    शाळेचे नाव "लोकांची शाळा "होत शाळा आठवली
    तू छानच लिहिलं आहेस👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. WOW..!
    खूपच छान आठवणी ...👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🌷

    ReplyDelete
  7. शाळेच्या अमृतमय गोड आठवणी ...!✍️👌👌👌

    ReplyDelete
  8. धन्यवाद सर 🙏🏼

    ReplyDelete
  9. सुंदर आठवणी शाळेच्या 👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...