Tuesday, March 21, 2023

 


चैत्र पाडवा 

सण हर्षाचा 

रे चैतन्याचा 

नववर्षाचा


लागे चाहूल 

चैत्रगौरीची 

लगबग ती 

कैरी पन्हेची 


चैत्र पालवी

येता बहर 

फुलला असा 

गुलमोहर


आंबट गोड 

रानमेव्याची

मजा आगळी 

बोर, चिंचेची 


घालीतो शीळ

ऋतु वसंत 

नवी पालवी

ही बहरात

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

1 comment:

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...