मला राहू दे
अलिप्त....
बालपणीच्या आठवणीत
आईच्या वडीलांच्या मायेत
भावंडांच्या हास्य मेळात .....
मला राहू दे
अलिप्त .....
तारुण्याच्या दिवसात
मित्र मैत्रिणीच्या घोळक्यात
उंच भरारी घेण्यात ....
मला राहू दे
अलिप्त ....
संसाराच्या रम्य आठवणीत
दिलेल्या एकमेकांना साथीत
मिलनाच्या चांदण्या रातीत .....
मला राहू दे
अलिप्त .....
आईपण जगण्यात
मुलांच्या संगोपनात
त्यांच्या यश किर्तीत .....
मला राहू दे
अलिप्त .....
आयुष्याच्या उत्तरार्धात
जगु देत एकांतात
ईश्वराच्या नाम स्मरणात .....
मला राहू दे
अलिप्त ....अलिप्त...
सुंदर कविता लिहिली मॅडम!👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDelete