सजला अंबर चांदण्यांनी
चंद्र ही आहे सोबती
शीतल अशी रात्र आहे धुंद
मंद मंद रातराणीचा सुगंध
हा साजशृंगार तुझा ग सजणी
माझ्या मनास ग भुलवी
केशसंभार हा असा
करती मज वेडापिसा
कानातील तुझा झुमका
चुकवी ह्रदयाचा ठोका
किणकीण तुझ्या काकणाची
मनाच्या तारा ह्या छेडती
छमछम तुझ्या पैंजणाची
आहट देते तू येण्याची
येते अशी लाजत तू सजणी
होते उलघाल माझ्या अंतरी
तुझ्या कायेचा मधुर गंध
करुन जातो मज बेधुंद
साजणी, रात मीलनाची सजली
जन्मांतरीची साथ आपली
खूपच छान
ReplyDeleteखूप खूप छान 👌🏼👌🏼
ReplyDeleteव्वा व्वा खुप मस्त शब्दगुंफन केली सखी ✍️✍️🌟🌟
ReplyDeleteव्वाव...खूपच सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप छान!
ReplyDelete