Wednesday, February 2, 2022

प्रेमकहाणी

 

तुझ नी माझ

प्रेम पहिले
अनोखा भाव
ह्रदयी जागले

नवलाईची
प्रीत पहिली
आठवता तु
ये लाली गाली

विसरु कशा
आठवणी त्या
आपल्या भेटी
सांजवेळेच्या

सप्तपदीचे
स्वप्न नयनी
झाले साकार
सहजीवनी

पाहे दुनिया
प्रीत अनोखी
तुझी न माझी
प्रेमकहाणी

4 comments:

  1. खूपच छान ओळी आणि अप्रतिम शब्दरचना

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟🌟

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...