कौसल्या पोटी
श्रीराम जन्मी
पावन झाली
अयोध्या भूमी
पुत्र श्रीराम
आज्ञाधारक
वचना जागे
रघुनायक
बंधु लक्ष्मण
भार्या जानकी
साथ निभवी
हनुमानजी
शापमुक्त हो
अहिल्या होई
उष्टी बोर ती
हर्षून खाई
एकवचनी
रघुनंदन
राम स्मरता
पापशालन
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
व्वाह फारच सुंदर रचना ताई
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🏼🙏🏼
Delete