Saturday, May 13, 2023

आई....

 आई..... 

कशी होऊ ग 

मी तुझी उतराई

जन्मले तुझ्या उदरी 

भाग्य हे माझे ग आई 


कष्ट सोसले अपार 

उभी तु खंबीरपणे 

जपलेस ग आम्हांला 

तळहाताच्या फोडाप्रमाणे 


संकटाला ना भ्यालीस 

चढ उतार किती आयुष्यात 

दुःखात ही तु हसली 

सुख स्वप्ने जागली डोळ्यात 


सादगी सोज्वळतेची मुर्ती तु

वात्सल्य मायेची ग तु खाण 

माणुसकीचा धडा गिरवला 

दिलीस संस्कारांची शिकवण 


देवदैवत तुच माझे 

नतमस्तक तुझ्या पायी 

एकच आशिर्वाद मागते 

पुन्हा तुच मज हवी आई

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

5 comments:

  1. खूपच सुंदर आई विषय लिहले

    ReplyDelete
  2. आई....किती सुंदर गुणगान आणि अप्रतिम शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली!✍️👌
    मातृदिनाच्या महन्मंगल शुभकामना!🙏

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचनाविष्कार ✍️👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना तुम्हाला मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...