माझ म्हणणे लादत नाही
तू काही समजून घेत नाही
रंगवली स्वप्नं मी आपल्या सुखाची
तू रंगवली चित्रे दिखाव्याची
मागीतला मी सुखी संसार
बांधलस तू चार भिंतीच घर
कवितांमधून होत होते व्यक्त मी
व्यस्त तू वाचण्यात शेअर मार्केटची बातमी
रमायचं होत तुझ्या प्रेमात
रमलास तू तुझ्याच यशात
मला माझं म्हणणे लादायच नाही ......
खूपच सुंदर अप्रतिम लिहले भावनिक शब्द रचना आहे.
ReplyDelete