Sunday, January 16, 2022

म्हणणे लादत नाही

 माझ म्हणणे लादत नाही

तू काही समजून घेत नाही

रंगवली स्वप्नं मी आपल्या सुखाची
तू रंगवली चित्रे दिखाव्याची

मागीतला मी सुखी संसार
बांधलस तू चार भिंतीच घर

कवितांमधून होत होते व्यक्त मी
व्यस्त तू वाचण्यात शेअर मार्केटची बातमी

रमायचं होत तुझ्या प्रेमात
रमलास तू तुझ्याच यशात

मला माझं म्हणणे लादायच नाही ......

1 comment:

  1. खूपच सुंदर अप्रतिम लिहले भावनिक शब्द रचना आहे.

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...