Wednesday, January 19, 2022

नशीब

 काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा

ओळखीची पण अनोळखी वाटते नजर
न हसताही दिसणारी हास्याची लकेर

काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा

हातातल्या कांकणाची किणकीण
अन छमछम करणारे ते पैंजण

काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा

ही प्रेमाची वाट अंधारलेली
का आहे दूरी आपल्यातली

काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा

बुजून काढण्या ही दरी घेऊ जन्म पुन्हा पुन्हा

7 comments:

  1. वाहह...खुप सुंदर शब्दांकन, ह्रदयस्पर्शी रचना...👏👏👏

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟🌟

    ReplyDelete
  4. व्वाऽ
    खूपच छान 👌
    🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    ReplyDelete
  5. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  6. क्या बात हैऽऽऽ सुंदर अप्रतिम लिहले आहे

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...